तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे. या मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारणारा अभिनेता हार्दिक जोशी हा प्रेक्षकांचा आवडता आहे. तुझ्यात जीव रंगला मधील राणा असो किंवा तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं मालिकेतील सिद्धार्थ, हार्दिक फक्त अभिनयानेच त्या भूमिका आत्मसात करत नाही तर त्या भूमिकेला अनुसरून आपली शरीरयष्टी आणि देहबोली याकडे देखील तितकाच लक्ष देतो.